मुंबईतील ‘या’ रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार? नामांतराच्या मागणासाठी मूक मोर्चा
VIDEO | मुंबईतील 'या' रेल्वे स्टेशनचं नाव बदला, नामांतराच्या मागणीसाठी मुंबईतील नाना चौक येथून निघणार मूक मोर्चा
मुंबई : मुंबई टर्मिनस रेल्वे स्थानकाचे नामांतर करून नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस करण्याच्या मागणीसाठी नाना प्रेमी रस्त्यावर उतरत आज मूक मोर्चा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. हा मूक मोर्चा मुंबईतील नाना चौक येथून काढण्यात आला. मुंबई टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या नामांतराचे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रलंबित असल्याने आज नाना शंकर शेठ प्रतिष्ठान मंडळाच्या सदस्यांनी अमित शाह यांना भेट दिल्याचे सांगितले जात आहे. तर या काढण्यात आलेल्या मूक मोर्चाच्या माध्यमातून अमित शाह यांच्यापर्यंत पुन्हा एकदा मुंबई टर्मिनस रेल्वे स्थानकाचे नामांतर करून नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस असे करावे, ही मागणी पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे नाना शंकर शेठ प्रतिष्ठानकडून सांगितले जात आहे. नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस नामांतरासाठी आज निघालेला मोर्चामध्ये मुंबईकर नागरिकांनी नाना शंकर शेठ आणि इंग्रज यांची वेशभूषा परिधान केली होती. तर नाना शंकर शेठ हे स्वतः या मोर्चामध्ये नामांतराच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.