भाजपकडून कुणाला लोकसभेचं तिकीट? ‘या’ 6 जणांची समिती ठरवणार, कोणा-कोणाचा समितीत सहभाग?

| Updated on: Feb 29, 2024 | 5:36 PM

लोकसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सहा जण असणारी समिती नेमण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य नावे या 6 जणांच्या समितीकडून जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सहा जण असणारी समिती नेमण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्राकांतदादा पाटील आणि आशिष शेलार या समितीत असणार आहे. दरम्यान, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य नावे या 6 जणांच्या समितीकडून जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर समितीत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्राकांतदादा पाटील आणि आशिष शेलार या नेत्यांकडून भाजपकडून लोकसभेचं तिकीट कुणाला द्यायचं हे ठरवण्यात येणार आहे. यासह शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे. त्यापैकी 2 जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Feb 29, 2024 05:36 PM
नमो महारोजगार’ मेळावा बारामतीत अन् कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा