Nana Patole यांनी उल्लेख केलेला तो मोदी मीच : Umesh Gharde

Nana Patole यांनी उल्लेख केलेला ‘तो’ मोदी मीच : Umesh Gharde

| Updated on: Jan 22, 2022 | 7:03 PM

मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे.

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा गावगुंड अखेर प्रकटला आहे. टीव्ही9 मराठीशी या कथित मोदीने संवादही साधला आहे. माझी पत्नी सोडून गेली. म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात. मी दारुचा व्यवसाय करतो. मी गावगुंड आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद थांबणार का? असा सवाल केला जात आहे. उमेश घरडे असं या व्यक्तीचं नाव आहे. मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे. या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं.

लोकांच्या हिताची नक्कीच कामं करेन : Rohit Pawar
Disale Guruji यांचा मार्ग मोकळा, परदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याचे Varsha Gaikwad यांचे आदेश