भिवंडी दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांची धाव, पाहणीनंतर मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

| Updated on: Apr 30, 2023 | 10:01 AM

VIDEO | भिवंडीतील वलपाडा येथील इमारत दुर्घटनास्थळी मुख्यमंत्र्यांकडून रात्री पाहणी; तातडीने मृताच्या कुटुंबियांना केली मदत जाहीर

ठाणे : भिवंडीतील वलपाडा येथे तीन मजली इमारत काल कोसळली. दरम्यान, घटनास्थळी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणीसाठी दाखल झाले होते. यावेळी ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले. तर कोसळलेल्या इमारती खाली गोडाऊन आणि वरती काही नागरिक राहायला होते. यामध्ये सात ते आठ कुटुंब राहायला होते आणि जेव्हा इमारत पडली तेव्हा महापालिकेची रेस्क्यू ठाण्यातील TDRF टीम, पोलीस यंत्रणा, NDRF टीम या ठिकाणी पोचलेली होती. या ठिकाणी जेवढे लोकं भेटले आहेत त्यातील नऊ लोकं सुदैवाने सुखरूप काढण्यात आलेत तर तीन लोक मृत झालेले आहेत. काही लोक अजून अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांना जिवंत बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहेत. इमारत पडल्यानंतर १२ लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी TDRF टीमचं कौतुक केले आहे. दरम्यान, जे मृत झाले आहेत त्यांच्या मागे सरकार उभं आहे त्यांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्या उपचारावरील खर्च आमचे संपूर्ण शासन करणार आहे.

Published on: Apr 30, 2023 10:01 AM
कृषी उत्पन्न बाजार समितींचा आज निकाल; जळगावात गुलाबराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला
वर्चस्व कायम, सलग सातव्यांदा प्रतापराव जाधव यांची मेहकर बाजार समितीवर सत्ता