पिंपरी-चिंचवड: मारहाण करून समाधान झालं नाही म्हणून महिलेसोबत केलं किळसवाणं कृत्य
शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपींनी हा संताप आणणारा प्रकार केला शिवाय महिलेला मारहाणही (Beating) केली. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेला लघवी (Urine) पाजण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना पिंपरीत घडली आहे. शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपींनी हा संताप आणणारा प्रकार केला शिवाय महिलेला मारहाणही (Beating) केली. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूसगाव याठिकाणी 15 मेरोजी हा प्रकार घडला. याविषयी पीडित महिलेने शनिवारी (21 मे) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली. फिर्यादी महिला आपल्या सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली होती. त्यावेळी तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. यामुळे आरोपींना राग अनावर झाला. संतापाच्या भरात सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.