Pune | 31 डिसेंबर रोजी दारु नको दूध प्या, पुण्यातील सामाजिक संस्थांचा उपक्रम
आनंदवन संस्थेकडून लोकांना या अनोख्या सेलिब्रेशनची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, सध्या तरूणाई व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे, त्यामुळे त्यांना व्यसनाकडून सदृढतेकडे नेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला नाही, फक्त तरुणाईच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना याचा फायदा होणार आहे.
पुणे : दरवर्षी 31 डिसेंबरला ठिकठिकाणी दारु पार्टीचे आयोजन करण्यात येते. मग ते पब असो, बार असो, रेस्टॉरंट असो किंवा मित्रांच्या पार्ट्या असो, 31 डिसेंबरला जणू दारुचे पाट वाहतात, पुणेकर मात्र नेहमीच कायतरी हटके करत असतात, यंदाही 31 डिसेंबरला म्हणजे आज पुण्यात अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे लोकांना दारू न पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरनिमित्त दारू नको दूध प्या अशी हाक देण्यात आली आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदवन संस्थेकडून लोकांना या अनोख्या सेलिब्रेशनची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, सध्या तरूणाई व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे, त्यामुळे त्यांना व्यसनाकडून सदृढतेकडे नेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला नाही, फक्त तरुणाईच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.