एसटी महामंडळाच्या बसला दे धक्का! गतिमान सरकारची जाहिरातबाजी होतेय ट्रोल, बघा काय आहे प्रकार?

| Updated on: Mar 07, 2023 | 11:52 PM

VIDEO | राज्य सरकारची ती जाहिरात व एसटी बस पुन्हा चर्चेत, वेगवान निर्णय, महाराष्ट्र गतिमान अशी जाहिरात असलेल्या बंद एसटी बस प्रवाशांचा दे धक्का

धाराशिव : धाराशिवमधील तेर बस स्थानकावरील एसटीला धक्का मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राज्य सरकारची ती जाहिरात व एसटी बस पुन्हा चर्चेत आली आहे. एकनाथ शिंदे दे धक्का… असे म्हणत वेगवान निर्णय, महाराष्ट्र गतिमान अशी जाहिरात असलेली बंद एसटी बस प्रवाशांनी धक्का मारून चालू केली. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील बसस्थानकावरील व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चेत आला आहे. बसचे स्टार्टर खराब असल्याने एसटी बंद होती त्याला प्रवाशी लहान मुलांनी धक्का दिला मात्र बस चालू नाही. एसटी महामंडळाच्या अनेक बसची दुरावस्था असून मोडकळलेल्या व खराब बस रस्त्यावर धावत आहेत. त्यावर गतिमान सरकारची जाहिरात असल्याने ती चांगलीच ट्रोल होत आहे. वर्तमान साकार, भविष्यास आकार – योजना दमदार, जनतेचे हे सरकार जाहिरात पुन्हा चर्चेत आली असून खराब बसवर जाहिरातबाजी करीत कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत

Published on: Mar 07, 2023 11:48 PM
Special Report | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार? पाहा CM शिंदे काय म्हणाले
बुरा ना मानो होली है | 50 खोके एकदम ओके; ठाण्यात धुळवडीतही खोक्यांच्या शुभेच्छा