Special Report | तामिळनाडूच्या कून्नूरमधील हेलिकॉप्टर अपघातास कारण काय?

Special Report | तामिळनाडूच्या कून्नूरमधील हेलिकॉप्टर अपघातास कारण काय?

| Updated on: Dec 09, 2021 | 10:55 PM

हेलिकॉप्टर घरघर करतानाच हा आवाज नेहमीप्रमाणे न वाटल्याने हे लोक पळतच पुढच्या दिशेने गेले. त्यावेळी त्यांना एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे हेलिकॉप्टर ढगात गडप झालं. पण हेलिकॉप्टरची घरघर कायम होती. ही घरघर ऐकून हे पर्यटकही घाबरल्याचं दिसून येतं.

चेन्नई: सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, हा व्हिडीओ खरा असल्याचं आढळून आलं आहे. टीव्ही9च्या रिपोर्टरने घटनास्थळी जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली असता हा व्हिडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे सर्व लोक पर्यटक असल्याचं सांगितलं जातं. व्हिडीओत प्रत्यक्ष एक पुरुष आणि चार महिला दिसत असल्या तरी प्रत्यक्षात घटनास्थळी दोन पुरुष असल्याचं संभाषणावरून दिसून येत आहे. हे लोक रुळावरून चालत असताना त्यांना हेलिकॉप्टरची भयंकर घरघर ऐकायला आली. हेलिकॉप्टर घरघर करतानाच हा आवाज नेहमीप्रमाणे न वाटल्याने हे लोक पळतच पुढच्या दिशेने गेले. त्यावेळी त्यांना एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे हेलिकॉप्टर ढगात गडप झालं. पण हेलिकॉप्टरची घरघर कायम होती. ही घरघर ऐकून हे पर्यटकही घाबरल्याचं दिसून येतं. एकाने तर हेलिकॉप्टरची घरघर ऐकून कानात बोटं घातली. हेलिकॉप्टर ढगात गेल्यानंतर एका व्यक्तीने व्हिडीओ शुटिंग करणाऱ्या व्यक्तीला तमिळमध्ये काही तरी विचारलं. काय झालं? हेलिकॉप्टरचा असा आवाज का येतोय? असं कदाचित या व्यक्तिने विचारलं असावं. त्यावर दुसऱ्या व्यक्तीने आमा… असं म्हटलंयाचं ऐकू येतं.

Special Report | जनरल बिपीन रावत यांच्या जागी कोण?
Special Report | मुंबईवरचा हल्ला ते केदारनाथ…MI-17 चं महत्व काय?