हिंमत असेल तर…, आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज

| Updated on: Feb 04, 2023 | 10:25 AM

आदित्य ठाकरे यांनी दिलेले चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार की त्याला थेट उत्तर देणार?

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट राजीनामा देण्याचे आव्हानच दिले आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांचे हे चॅलेंज स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरळीतील एका कार्यक्रमातून बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांनाही आव्हान दिले आहे. 40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीमाना द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो.

Published on: Feb 04, 2023 10:25 AM
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन सुस्साट ! अर्थसंकल्पात इतक्या भरीव निधीची तरतूद
मोदीजी, तुम्ही राणेंसारख्या खोटारड्या माणसाला मंत्रिमंडळात कसं काय ठेवता?; संजय राऊतांचा सवाल