मला ‘तो’ फोटो पाहूनच हसू आलं, मुख्यमंत्र्यांवर आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला

| Updated on: Dec 10, 2023 | 1:37 PM

जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केल्याचे पाहायला मिळाले. यावरच आदित्य ठाकरे यांचा निशाणा

Follow us on

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बीएमसीने संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दिनांक ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर शनिवारी दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केल्याचे पाहायला मिळाले. यावरच आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. तर समुद्रात कोणी ट्रॅक्टर चालवतं का? असा सवाल करत फोटोसाठी पोज द्यायची तर नीट द्यायची ना… असा खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.