भूषण देसाई यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर आदित्य ठाकरे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Mar 13, 2023 | 8:00 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले बघा...

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश झाला असून त्यांनी शिवबंधन बांधले आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं, सुभाष देसाई आमच्यासोबत आहेत. २४ तास ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. ते आम्हाला सोडून कधीही जाणार नाही.’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले तर हा आमच्यासाठी धक्का वैगरे काहीही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 13, 2023 08:00 PM
सुभाष देसाई यांचे पुत्रं भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटातून आली पहिली प्रतिक्रिया
शीतल म्हात्रे प्रकरण आता SIT कडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत काय दिली माहिती?