‘उगाच लोकांना काहीतरी दाखवायचं, आजचा अर्थसंकल्प म्हणजे…’, आदित्य ठाकरे यांनी काय दिली प्रतिक्रिया बघा
VIDEO | यंदाचं बजेट हे उगाच लोकांना काहीतरी दाखवायचं असं झालेलं आहे, आजचा अर्थसंकल्प म्हणजे...; आदित्य ठाकरे यांचनी काय दिली प्रतिक्रिया?
मुंबई : येत्या एक-दोन महिन्यात सरकार कोसळणार आणि कदाचित निवडणुका लागू शकतात, हे उपमुख्यमंत्र्यांना माहित असेल म्हणून एवढ्या मोठ्या घोषणा झाल्या असाव्यात, आणि आजचा अर्थसंकल्प म्हणजे हसवाफसवी बजेट असं झालेलं आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या बजेटमधून उगाच लोकांना काहीतरी दाखवायचं असं झालेलं आहे. विधानभवनात आणि विविध वेगवेगळ्या मंचावर अनेक घोषणा झाल्या आहेत. रिकाम्या खुर्च्यांसमोर घोषणा झाल्या आहेत. पण एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ज्या सरकारमध्ये गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन गद्दारी केलेली आहे, पाठीत खंजीर खुपसला अशा सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. हे लोकं संत, धर्मांबद्दल बोलणं यांच्या तोंडी शोभत नाही. या थोर व्यक्तींची नावं घेतंय कोण? तर ज्यांनी पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, ज्याने महाराष्ट्राची बदनामी केली, महाराष्ट्राचे उद्योग पळवून लावले. अशी लोकं ही नावं घेतात. असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.