मंत्रिपदासाठी ठाकरेंना १ कोटीची चेक? दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही', असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केरसकर यांनी केला. भर पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. यावर ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केरसकर यांनी केला. भर पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. यावर ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत केसरकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘खोट्या लोकांकडे किती लक्ष दिले पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याचा पण विचार करायला पाहिजे. आणि हे स्वतः आरश्यात तरी कसे बघू शकतात लोकं याचा मला प्रश्न पडतो.’, असे म्हणत ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर बोचरी टीका केली आहे.
Published on: Feb 08, 2024 02:28 PM