दिल्लीत शिवसेनेचा आवाज बुलंद होणार, सिल्वासातील सभेनंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राला बदनाम करम्याचे कारस्थान रचले आहे. पण इथे लढाई हुकूमशाही विरुद्ध आहे इथल्या न्याय हक्कांसाठी आहे. दिल्लीत आमची तोफ बुलंद आहेच आणि आणखी एक खासदार वाढल्या नंतर ती आणखी बुलंद होईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आतापर्यंतची राजकीय संस्कृती अशी होती की जेव्हा अशी घटना (मृत्यू) घडते तेव्हा निवडणुकीत कुणी समोर उभे राहत नाही. त्यांनी (भाजप) ती मोडली. विरोधी पक्षाच्या आरडाओरडयाला मी महत्व देत नाही कारण महाराष्ट्रातही ते तेच करीत असतात. कोव्हिड काळात महाराष्ट्रात जे काम झालं, महाविकास आघाडी म्हणून जे तीन घटक पक्ष आहोत तसं इथे जिंकल्या नंतर करू. इथे भूमीपुत्रांचा आवाज बुलंद करणार आहोत. अभिनवजी स्वतः आहेत. कलाबेन जिंकल्यानंतर इथे जे उद्योजक आहेत यांच्यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवून उद्योग आणि रोजगार वाढवू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.