आदित्य ठाकरे यांचं हवाई उड्डाण मंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रासाठी कोणती महत्त्वाची मागणी?
VIDEO | आदित्य ठाकरे यांचं हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र, काय आहे कारण?
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले आहे. आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात राज्यातील ४ विमानतळासंदर्भात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यासह पालघर आणि फर्दापूरच्या विमानतळाचे काम सुरू करण्यात यावे, अशीही विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. पालघर जिल्ह्यात आणि फर्दापूर येथे नव्याने विमानतळ सुरू करण्याच्या कामाला सुरूवात करावी, तर पुणे आणि नाशिक येथेही नवीन विमानतळ बांधण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Published on: Mar 08, 2023 02:26 PM