Special Report | महाराष्ट्रात आप पुन्हा चर्चेत
दिल्लीतील सत्ताधारी आम आमदी पक्षाने सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये जोरदार झाडू फिरवत आपली सत्ता आणली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेनं आपकडे सत्ता दिली आहे.
दिल्लीतील सत्ताधारी आम आमदी पक्षाने सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये जोरदार झाडू फिरवत आपली सत्ता आणली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेनं आपकडे सत्ता दिली आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली तर राज्यातील समीकरणं बदलणार आहेत. मुंबई बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना टार्गेट करुन आपने जोरदार आंदोलन केले. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांपेक्षाही आता आप चर्चेत आली आहे. येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर आपने आपला झाडू फिरवला तर मात्र आप पुन्हा एकदा सीमोल्लंन करणार आहे.
Published on: Mar 31, 2022 12:01 AM