इतिहासात पहिल्यांदाच मतपत्रिका थेट सुप्रीम कोर्टात अन् भाजपला झटका

| Updated on: Feb 21, 2024 | 11:58 AM

महापौर निवडीच्या मतपत्रिका थेट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आल्यात. चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणावरून भाजपला झटका बसला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या खोटारडेपणावर ताशेरे ओढत ८ मतं कोर्टानं अवैध ठरवली आणि आपचा महापौर विजयी

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, महापौर निवडीच्या मतपत्रिका थेट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आल्यात. चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणावरून भाजपला झटका बसला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या खोटारडेपणावर ताशेरे ओढत ८ मतं कोर्टानं अवैध ठरवली आणि आपचा महापौर विजयी झाला. दरम्यान, आपचे तीन नगरसेवक फुटूनही भाजपच्या महापौरपदाचं स्वप्न भंगल्याचं समोर आले आहे. चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. निवडणूक अधिकाऱ्यानं भाजपच्या मनोज सोलकर यांना विजयी केलं होतं. मात्र निवडणूक प्रक्रियेत विरोधकांनी ८ मतं अवैध्य ठरवत निवडणूक अधिकाऱ्यानं हस्तक्षेप केला असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना चंदीगढचं महापौर म्हणून घोषित केलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 21, 2024 11:58 AM
मराठ्यांचं स्वतंत्र 10 टक्के आरक्षण कोर्टात टिकणार की अडकणार?, घटनातज्ज्ञांचं मत काय?
इस देश मे रहना है, तो श्रीराम…; नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना सुनावलं