अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव यादीत?

| Updated on: Oct 21, 2024 | 5:33 PM

भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या तब्बल ९९ जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. बघा कोणा-कोणाचं नाव यादीत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाकडून १६ जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. तर अवघ्या काही क्षणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली वहिली यादी जाहीर केली जाणार आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन गटात विभाजन झाले आहे. यानंतर पहिल्यांदाच शरद पवार गट यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार गट यांची राष्ट्रवादी आमने-सामने येताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आलेल्या 16 जणांमध्ये संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा,  राजेश पाटील , दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, ⁠बाबासाहेब पाटील, ⁠अतुल बेनके,  ⁠नितीन पवार, ⁠इंद्रनील नाईक आणि बाळासाहेब आजबे यांचा समावेश आहे. आज विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्याकडून 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Oct 21, 2024 05:30 PM
MSRTC : दिवाळी तोंडावर असताना ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की नाही?
Vitthal Birdev Yatra : भंडाऱ्याची उधळण जणू सोन्याची झळाळीच, पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ