पुणे मनपाकडे 23 गावांतील शाळा, अंगणवाड्या जमिनी वर्ग, अजित पवारांच्या बैठकीत निर्णय
जी 23 गावं नव्याने पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्याच्या शाळा, जमिनी ,अंगणवाड्या त्या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घेतला.
मुंबई: जी 23 गावं नव्याने पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. त्याच्या शाळा, जमिनी ,अंगणवाड्या त्या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. त्याला सर्व विभागांनी मंजुरी दिली. सर्व लोक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते आताही अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. त्यामुळे पुण्याचे महापौर उपस्थित रहायला हवे होते आता त्यांना स्पेसिफिक बोलले की नाही बोलले हे मला माहिती नाही.नगरविकास, महसूल ग्रामविकास, ग्राम विकास या सर्व विभागांना एकत्र आणून या गावाबाबत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
Published on: Jun 29, 2021 04:54 PM