MPSC पूर्व परिक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप, अभाविपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jan 23, 2022 | 2:30 PM

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नागपुरातील आंदोलनस्थळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी सदर्न पॉईंट शाळा परीक्षा स्थळी आंदोलन सुरू केले होते.

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नागपुरातील आंदोलनस्थळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी सदर्न पॉईंट शाळा परीक्षा स्थळी आंदोलन सुरू केले होते. आज एकाच दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर्स आहेत. तीन वाजताचा दुसरा पेपर निर्धोकपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांना बळजबरीने उचलून पोलीस ठाण्यात नेले. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी घटनास्थळी पोचत पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला.

बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मी नसतो – संजय राऊत
हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका