त्यामुळे आता मला पाठींबा द्या, अभिजीत बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
श्रीकांत शिंदे म्हणजे छत्रपती नव्हे, ही मुंबई सर्वांची आहे. मुंबईकरांच्या विश्वासावर मी उभा राहिलोय. इथली जनता सुज्ञ आहे. जातीय वाद होत नाही. मुंबईत बुद्धीवादी मोठे झाले म्हणून मी इथे आलोय. त्यांच्यासाठी मी कल्याणातून निवडणूक लढवतोय. तर कलाकाराच्या मागे उभा असतो, त्यामुळे आता मला पाठींबा द्या''
कल्याण लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दोन वेळा निवडून आलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे, याच मतदारसंघात आपल्या वेगळ्या स्टाईल आणि अंदाजामुळे प्रसिद्ध असलेले बिग बॉस फेम अभिजीत बिचूकले हे देखील निवडणूक लढवणार आहेत. नुकताच अभिजीत बिचूकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर श्रीकांत शिंदे म्हणजे छत्रपती नव्हे, ही मुंबई सर्वांची आहे. मुंबईकरांच्या विश्वासावर मी उभा राहिलोय. इथली जनता सुज्ञ आहे. जातीय वाद होत नाही. मुंबईत बुद्धीवादी मोठे झाले म्हणून मी इथे आलोय. त्यांच्यासाठी मी कल्याणातून निवडणूक लढवतोय. तर कलाकाराच्या मागे उभा असतो, त्यामुळे आता मला पाठींबा द्या यासह डॉ. बाबासाहेबांचं नाव संसदेला द्यावं ही माझी मागणी असल्याचे बिचूकले म्हणाले. अभिजीत बिचूकले हे अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचं दूरदर्शन हे निवडणूक चिन्ह असून त्यांनी मतदारांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन केलंय.