अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, बारामतीतून लढणार विधानसभा; पवाराचं टेन्शन वाढलं

| Updated on: Oct 29, 2024 | 5:26 PM

बारामतीमध्ये यावेळी राष्ट्रवादी आजित पवार गटाकडून स्वत: आजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीमध्ये काका विरोधात पुतण्या असा हा सामना रंगणार असताना अभिजित बिचकुले हे देखील याच मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत.

अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता अभिजित बिचुकले बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अभिजित बिचुकले हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात असल्याने आता मात्र पवारांचं टेन्शन वाढताना दिसणार आहे. अभिजित बिचुकले हे बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार या काका-पुतण्यामध्ये तगडी लढत होणार आहे. अशातच आता या मतदारसंघात आता अभिजित बिचुकले हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला, आता विधानसभेला पवार कुटुंबातील दोन जण आमने-सामने येणार आहेत.

Published on: Oct 29, 2024 05:26 PM
Pawar Emotinal : पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?
‘माझा केसांनी गळा कापला, मला बदनाम…’, अजितदादांचे आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप