VIDEO : Shivleela Patil | …जर वारकरी सांप्रदायची भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते : शिवलीला पाटील
‘बिग बॉसच्या घरात संतांची शिकवण देण्याचा प्रयत्न केला, मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी टीव्ही9शी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
‘बिग बॉसच्या घरात संतांची शिकवण देण्याचा प्रयत्न केला, मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी टीव्ही9शी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला पाटील यांची निवड झाल्यापासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होत्या. शिवलीला पाटील यांनी वैद्यकीय कारणातून बिग बॉसच्या घरातून माघार घेतली. वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज होते. त्यांच्याशी बातचीत करूनच निर्णय घ्यायला पाहिजे होता, असं देखील त्या म्हणाल्या.