अजितदादा नाराज? कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेरी, मग ‘देवगिरी’वर स्वतंत्र बैठक कशासाठी?

| Updated on: Oct 04, 2023 | 11:45 AM

VIDEO | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राज्याच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थिती नाही, शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यालाही नाही मात्र देवगिरीबंगल्यावर का घेतली स्वतंत्र बैठक?

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | अजितदादा नाराज झालेत का? अशा चर्चा अचानक सुरू झाल्यात. कारण कॅबिनेट मिटींगला अजित दादा आले नाहीत. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले पण त्यांच्यासोबतही दादांनी जाणं टाळलं. मात्र असं असलं तरी देवगिरी बंगल्यावर त्यांनी स्वत:च्या मंत्र्यांनी बैठक घेतल्याचे समोर आले. अजित पवारांना नेमकं काय झालं? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, अजित दादा आधी कॅबिनेटच्या बैठकीलाही आले नाहीत आणि शिंदे फडणवीसांसोबत दिल्ली दौऱ्यावरही गेले नाहीत त्यामुळं दादा नाराज झालेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळातही सुरु झाली आणि विरोधकांनीही त्यांच्या नाराजीवरुन प्रतिक्रिया दिल्यात. कॅबिनेट सारख्या बैठकीला दादा कधी गैरहजेरी लावत नाहीत मात्र दादा आलेच नाहीत.

दरम्यान दिल्लीत 7 तारखेला होणाऱ्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीलाही दादा जाणार नसल्याचं कळतंय. विशेष म्हणजे दादा कॅबिनेटच्या बैठकीला आले नाहीत. दिल्लीलाही शिंदे फडणवीसांच्या सोबत गेले नाहीत मात्र देवगिरी बंगल्यावर त्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. आता ही बैठक अचानक कशासाठी? यावरुनीही चर्चा रंगलीय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 04, 2023 11:45 AM
Devendra Fadnavis यांनी ठणकावून सांगितलं…भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
ट्रिपल इंजिनचं सरकार पूर्णपणे स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, काय आहे रुग्णालयाचं वास्तव?