Abu Azmi | देशात नग्न फोटो चालतात मग हिजाब का नाही? अबू आझमींचा सवाल, रणवीर सिंहवर काय बोलले आझमी, जाणून घ्या…
सोलापुरात (Solapur) आज अबू आझमी यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरूनही त्यांनी टीका केली. भाजपला रोखण्यासाठी मविआला पाठिंबा, असं आझमी म्हणालेत.
सोलापूरः समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी (Abu Azmi) यांनी पत्रकार परिषदेत देशातील काही प्रश्नांवर सणकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी अभिनेता रणवीर सिंह याच्या नग्न फोटोवरही भाष्य केलंय. ‘देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात. एक महिला लिव्ह इनमध्ये राहिलेली चालते. दोन पुरुष एकमेकांसोबत राहिलेले चालतात. मग हिजाबलाच (Hijab) काय अडचण आहे? हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कसा घेतला जातो, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते, 30 वर्षे सेक्युलर सरकार देऊ, मात्र कुणीही आपलं वचन पाळलं नाही, या शब्दात अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सोलापुरात (Solapur) आज अबू आझमी यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरूनही त्यांनी शिवसेना-भाजसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. भाजप सत्तेत येऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.