सुजय विखेंच्या आव्हानाला निलेश लंकेंचं जशास तसं उत्तर, थेट घेतली इंग्रजीतून शपथ
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून आपल्या खासदारकीची शपथ घेतली आहे. सुजय विखे यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं.
केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता संसदेचं अधिवशेन सुरु असताना यावेळी खासदारांचा शपथविधी झाला. यावेळी महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी आणि काही खासदारांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून आपल्या खासदारकीची शपथ घेतली आहे. सुजय विखे यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं. सुजय विखेंचं आव्हान स्वीकारून निलेश लंके यांनी संसदेतून थेट उत्तर दिलं आहे. दरम्यान, त्यांनी खासदारकीची शपथ घेतल्याचा तो क्षण ट्वीट करून ‘आज मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून इंग्रजीत शपथ घेतली. या क्षणी किती मोठी जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेप्रती असलेली माझी कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे’, असे म्हटले.