मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा

| Updated on: Jun 13, 2023 | 3:44 PM

VIDEO | पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, नेमकं काय घडलं?

पुणे : मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली असून आग विझविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. हा भीषण अपघात झाल्यानंतर पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची हानी झाली आहे. केमिकल घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली.

Published on: Jun 13, 2023 03:42 PM
“शिंदे चांगले प्रोड्युसर, चांगले डारेक्टर”, शिवसेनेच्या जाहिरातीवरुन ठाकरे गटाची टीका
‘मुख्यमंत्रीसाहेब न्याय द्या’, कोणत्या कर्मचाऱ्यांनी काढला बिऱ्हाड मोर्चा?