शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वार येऊन धडकले

| Updated on: Nov 23, 2021 | 11:57 AM

सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला.

बुलडाणा : सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar Accident) गाडीला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सोमवारच्या रात्री ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना घेऊन रविकांत तुपकर औरंगाबादकडे रवाना झाले.

Satara | शशिकांत शिंदे पराभवानंतर कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक
शशिकांत शिंदे समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक; दंगेखोरांना सडेतोड उत्तर देऊ, विजयी उमेदवार रांजणेंचा इशारा