Washim | वाहनाची वानरालाला धडक; वानरांनी केलं रस्त्यावर ट्रॅफिक जॅम
वाशिम जिल्हातील महागाव कारंजा रस्त्यावर अचानक एका गाडीने वानराला धडक दिली.आपल्यासोबतच्या एका साथीदाराचा अपघात झालेले बघताच मदतीसाठी अनेक वानरे रस्त्यावर आली.
वाशिम जिल्हातील महागाव कारंजा रस्त्यावर अचानक एका गाडीने वानराला धडक दिली.आपल्यासोबतच्या एका साथीदाराचा अपघात झालेले बघताच मदतीसाठी अनेक वानरे रस्त्यावर आली. इतकेच नव्हेतर त्या वानराला वाचवण्यासाठी इतर सर्व वानरे प्रयत्न करत होती. मात्र, अचानकच त्या वानराने आपला जीव सोडला आणि उपस्थित सर्व वानरांनी रस्ता रोखून ठेवला. हा सगळा प्रकार हृदय हदरवणारा होता. त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या वानरांच्या शरीर हालचालीद्वारे स्पष्ट दिसत होते.