लतादीदींची प्रकृती स्थिर, अशा भोसले यांची माहिती
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना श्वासनाचा त्रास सुरू झाल्याने व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण असलेल्या आशा भोसले यांनी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची चौकशी केली.
मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना श्वासनाचा त्रास सुरू झाल्याने व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण असलेल्या आशा भोसले यांनी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्या औषधोपचाराला प्रतिसाद देत असल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे देखील अशा भोसले यांनी म्हटले आहे.