Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात कोणता पक्ष सर्वात मोठा? भाजप, शिवसेना की… कोणाला सर्वाधिक जागा?

| Updated on: Jun 01, 2024 | 8:44 PM

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच अनेक राजकीय विश्लेषकांनी आपले आपले अंदाज वर्तविले तर काही एक्झिट पोलही समोर आले आहेत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे.

देशात आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच अनेक राजकीय विश्लेषकांनी आपले आपले अंदाज वर्तविले तर काही एक्झिट पोलही समोर आले आहेत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता असल्याची चर्चा अशा पोल आणि सर्व्हेनुसार होताना दिसत आहे.

Published on: Jun 01, 2024 08:44 PM
Amravati Election Exit Poll 2024 : अमरावतीत तिरंगी लढत, लोकसभेत नवनीत राणांची आघाडी की पिछाडी?
Thane Loksabha Election Exit Poll 2024 : होमपीचवरच एकनाथ शिंदे यांना धक्का?; राज्यातील सर्वात मोठी बातमी