ताटाखालचं मांजर कोण? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सत्तेवरून जुपंली

| Updated on: Jan 24, 2024 | 6:04 PM

बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंध्या महाराष्ट्र ओरबाडाला जातोय, तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोयस अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई, २४ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राच्या हक्काचं का ओरबडताय? मिंधे बोलतात, बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंध्या महाराष्ट्र ओरबाडाला जातोय, तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोयस अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘वाघाचं कातड पांघरलं तरी लांडगा वाघ होत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं, बाळासाहेब ठाकरे हे एकच वाघ होते. त्यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. सरकार स्थापन करताना ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला दूर ठेवलं. त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर तुम्ही झालात, त्यामुळे सर्वात मोठा मिंधा कोण?’ असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Published on: Jan 24, 2024 06:04 PM
मोठी बातमी ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात, प्रकृतीबाबत अपडेट समोर
जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या हातांनी शेती करतात… फिरवलं रोटर अन्…