Nitesh Rane vs Aaditya Thackeray : 8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल

| Updated on: Mar 20, 2025 | 4:56 PM

दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे कोर्टात केली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनचं मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप होत आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राणे कुटुंबीय आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत आहेत. सातत्याने होणाऱ्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी आज विधानभवन परिसरात प्रत्युत्तर दिलंय. ‘पाच वर्ष हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे आता कोर्टात बोलू’, असं थेट उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले आहे. तर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून बदनामीचा प्रयत्न होत आहे. कोर्टात प्रकरण आहे. कोर्टात बोलू. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, तुम्हाला वारंवार सांगितलं की, माझं ट्विट पाहिलं असेल. आम्ही या सरकारला या अधिवेशनात एक्सपोज केलं आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळाले. ‘आता कोर्टात बघू… तुम्हाला जास्त त्रास नाही देणार.. जे बोलायचं ते कोर्टात बोला. पण कोर्टात हे ही सांगा ज्यांची मुलगी गेली दिशा सालियनचे वडील आता खोटं बोलताय.’ असं म्हणत 8 आणि 13 जूनच्या रात्री कुठे होतात आणि लोकेशन काय होतं ? हे सांगून टाकवं असं राणें म्हटलंय.

Published on: Mar 20, 2025 04:56 PM
Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी
Nagpur Violence : नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?