सभागृहात ‘वाद’, आरोप-प्रत्यारोप अन् बाहेर रंगतोय ‘संवाद’; नेमकं चाललंय तरी काय !

| Updated on: Mar 21, 2023 | 11:29 PM

VIDEO | विधिमंडळातील सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अन् बाहेर खेळीमेळीचं वातावरण, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : विधिमंडळातील सभागृहात भले आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असो. सत्ताधाऱ्यांकडून बोलू दिलं जात नाही किंवा विरोधकांकडून सभागृह चालू दिले जात नसल्याचे आरोप होत असो…पण सभागृहाबाहेर खेळीमेळीचं वातावरण आहे. सभागृहात वाद होत असले तरी सभागृहाबाहेर विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये होणारा संवाद आता चांगलाच चर्चेत आहे. यासंवादात आदित्य ठाकरे यांच्या मताशी भाजपचे प्रविण दरेकर सहमत होतायत तर शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्यामध्ये गप्पा रंगल्याचेही पाहायला मिळाले. कुठं अजित पवार चेष्टेने शंभुराज देसाई यांना धक्का देतायंत तर विरोधक सत्ताधाऱ्यांचं एकत्रित फोटो सेशन सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मात्र नेमकं चाललंय तरी काय… बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 21, 2023 11:29 PM
‘मातोश्रीची भाकरी अन् पवारांची चाकरी’, असं दादा भूसे यांनी म्हणताच अजित पवार भडकले
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर शेतककरी बरसले; म्हणाले…