अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, व्हायरल ऑडिओमध्ये नेमका संवाद काय?

| Updated on: Sep 30, 2024 | 9:46 AM

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर स्टोरीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एका अज्ञात व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. यामधून अनेक गोष्टी समोर येण्याचा दावा केला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या दाव्यानुसार अज्ञात व्यक्ती एन्काऊंटरच्या वेळी पोलीस व्हॅनच्या मागे एका गाडीत होता.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचं एन्काऊंटर फेकच होतं, हे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन अनोखळी व्यक्तींमधील संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. यासंवादात एन्काऊंटरवेळी एक व्यक्ती आपल्या मेहुण्यासोबत घटनास्थळावरून प्रवास करत असल्याचा दावा करतोय. एन्काऊंटरवेळी नेमकं काय घडलं? पोलीस कुठे थांबले? याबद्दलचा सारा घटनाक्रम या संवादात आहे. कोर्टात पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळावर एकूण चार राऊंड फायर झाले. गाडीत आधी अक्षय शिंदेने तीन गोळ्या झाडल्यात. यापैकी दोन पोलीस व्हॅनवर लागल्या. तर एक पोलिसांच्या पायावर मारली तर यालाच उत्तर देत पोलिसांनी एक गोळी अक्षयच्या डोक्यावर मारली. यावर स्थानिक लोक म्हणताय, प्रत्यक्षात घटनास्थळावरून तीनच गोळ्याचे आवाज आले मग चौथी गोळी कुठून आली? हा सवाल कायम आहे. तर आरोपी अक्षय शिंदेने ३ गोळ्या झाडल्या असतील तर इतर गोळ्यांचं काय झालं? असा सवाल कोर्टाने केला आहे.

Published on: Sep 30, 2024 09:46 AM
बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या, हिंदकेसरी नामंकित बैल जोड्यांचा थरार
लाडकी बहीण अन् सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?