Mumbai | मुंबईत रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लहान मुलांचे अपहरण, आरोपी अटकेत
जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका लहान मुलाला किडनॅप करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलगा गायब असल्याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दखल केली होती.
मुंबई : जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका लहान मुलाला किडनॅप करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलगा गायब असल्याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दखल केली होती. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचा तपास करण्यासाठी पाच पथकं तयार करून 4 तासमध्ये आरोपीचा शोध घेतला आहे. अटक करण्यात आलेल्या साईद शेख या आरोपीवर चोरी, ड्रग असे विविध गुन्हे दाखल आहेत.