पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका? कुणी दिली धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतील सायन परिसरातून अटक करण्यात आली आहे. या तरुणाविरुद्ध भादंवि कलम 505(1) अन्वये गुन्हा दाखल
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदाराने आरोपीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना मारण्यास सांगितले. इतकेच नाही तर मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये बॉाम्बस्फोट घडवून आणणार अशी धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या २९ वर्षीय तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर मुंबईतील सायन येथील न्यू म्हाडा कॉलनी परिसरात कामरान आमीर खान या नावाचा व्यक्ती राहतो. त्याने रविवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि ही धमकी दिली होती.
Published on: Nov 21, 2023 01:24 PM