मुख्यमंत्री शिंदे बनले ‘बुलडोझर बाबा’; यूपीप्रमाणे महाराष्ट्रातही अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर

| Updated on: Jun 25, 2024 | 1:28 PM

पुण्यातील घडलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर हा सवाल केला जात आहे. दरम्यान, अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर फिरवा, असे थेट आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून केली चर्चा

आता महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश प्रमाणे बुलडोझर पॅटर्न चालणार का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. पुण्यातील घडलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर हा सवाल केला जात आहे. दरम्यान, अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर फिरवा, असे थेट आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी अंमली पदार्थ तस्करांवर नव्याने कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना दिलेत. यानतंर बार, पब, हॉटेल यांच्या बांधकामांना नोटीसा पाठवण्यात येणार आहे. नोटीसवर उत्तर न दिल्यावर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, शिंदेंनी दिलेल्या आदेशानंतर पुणे महानगर पालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पुण्यातील L-3 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

Published on: Jun 25, 2024 01:28 PM
Kokan Weather Update : कोकणाला पावसानं झोडपलं, किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट काय?
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वरून लवकरच करता येणार प्रवास, कधी होणार खुला?