Walmik Karad Video : वाल्मिक कराडवर मकोका…. संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
खंडणीच्या प्रकरणात १४ दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर कराडला केज कोर्टात दाखल करण्यात आलं. कोर्टातील सुनावणीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावताच एसआयटीने वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल...
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात ९ वा आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा समावेश झालाय. तसंच वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये झाली आहे. तर आज हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालाय. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातच असलेला कराड आता हत्येच्याही गुन्ह्यात आलाय. तर हत्येच्या प्रकरणात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आलाय. खंडणीच्या प्रकरणात १४ दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर कराडला केज कोर्टात दाखल करण्यात आलं. कोर्टातील सुनावणीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावताच एसआयटीने वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याचे सांगत ताबा मागितला. आज वाल्मिक कराड पुन्हा एकदा हत्येच्या गुन्ह्यावरून पुन्हा कोर्टासमोर असणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला पोलीस कोठडी होण्याची दाट शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट ….