ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर श्रीलंकेत जाणार होता पण… कोणता मोठा खुलासा आला समोर?

| Updated on: Nov 03, 2023 | 12:15 PM

ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह १४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. ललित पाटील हा चेन्नई मार्गे श्रीलंकेत पळून जाणार होता, अशी माहिती समोर येत आहे.

पुणे, ३ नोव्हेंबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह १४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात आरोपी वाढल्यावर त्यांच्यावर मोक्का कारवाई करणार असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ललित पाटीलकडून ५ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ललित पाटील प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाणार होता, तर ललितने मैत्रिणींकडून २५ लाख रूपये घेतले, अशी माहिती समोर येत आहे. चेन्नई मार्गे ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाणार होता. ही तयारी सुरू असताना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Published on: Nov 03, 2023 12:15 PM
Maratha Reservation : अनोळखी फोन कॉलचा राजकीय नेत्यांनी घेतला धसका, काय आहे कारण?
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, काय व्यक्त केली खंत?