VIDEO : Pratap Sarnaik | घोटाळा झाला की नाही याची शहानिशा न करता कारवाई -प्रताप सरनाईक

| Updated on: Jul 06, 2021 | 3:56 PM

माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे.

“माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी”, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने 12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं कामकाम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले.

Published on: Jul 06, 2021 03:19 PM
VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 July 2021
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 6 July 2021