मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसची उमेदवार म्हणून लोकसभा लढणार?
काँग्रेसने गुरुवारी 57 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा अधिक
काँग्रेसने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून सात जणांना संधी दिली आहे. काँग्रेसने गुरुवारी 57 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा अधिक होताना दिसत आहे. उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची स्वरा भास्करने दिल्लीत भेट घेतली होती. तर मुंबईतील या महत्त्वाच्या मतदारसंघासाठी स्वरा भास्करचं नाव आघाडीवर असल्याने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, पुणे – रवींद्र धंगेकर, नंदुरबार – गोवाल पाडवी, अमरावती – वळवंत वानखेडे, लातूर – डॉ. शिवाजी कलगे आणि नांदेड – वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.