Saif Attack New CCTV Video : सैफवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. समोर आलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने स्वतःचा संपूर्ण चेहरा झाकल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोपीने सैफच्या इमारतीत एन्ट्री केल्यानंतर त्याने सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो लिफ्टने न जाता पायऱ्या चढून त्याने सैफचं घर गाठणं पसंत केलं. पायऱ्यावरून जात असतानाचंच सीसीटीव्ही फुटेज […]
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. समोर आलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने स्वतःचा संपूर्ण चेहरा झाकल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोपीने सैफच्या इमारतीत एन्ट्री केल्यानंतर त्याने सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो लिफ्टने न जाता पायऱ्या चढून त्याने सैफचं घर गाठणं पसंत केलं. पायऱ्यावरून जात असतानाचंच सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओमध्ये आरोपीच्या पाठीवर काळ्या रंगाची सॅक दिसत असून त्याने आपल्या चेहऱ्यावर लाल रंगाचा मोठा रूमाल बांधला आहे. गुरूवारी रात्री 1 वाजून 37 मिनिटांनी या आरोपीने सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी जिन्यांचा वापर केला होता. तर त्याच दिवशी 2 वाजून 33 मिनिटांनी तो त्याच जिन्यांनी सावधपणे इमारतीच्या बाहेर पळ काढताना दिसतोय. काल संध्याकाळी पोलिसांना पहिलं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यातील आरोपीचा फोटो पोलिसांनी शेअर केला होता. त्यानंतर आज आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. दरम्यान, गुरूवारी दोन वाजेच्या दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर दोन जखमा झाल्या होत्या. यासह सैफच्या मणक्याला जबर दुखापतही झाली होती. दरम्यान, यानंतर त्याला लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.