खासदारकीच्या शपथेनंतर पहिल्याच दिवशी कंगना रनौत सापडल्या वादात?
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची राखीव खोली मागितल्याने कंगना रनौत पुन्हा वादात आली आहे. नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी खासदारकीच्या शपथेनंतर पहिल्याच दिवशी देखील वादाची परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.
नेहमी वादात राहणाऱ्या कंगना रनौत यांचा खासदारकीचा पहिला दिवसही चर्चेसोबत वादात राहिला आहे. त्याचं कारण ठरलंय महाराष्ट्र सदनातील एक खोली…. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची राखीव खोली मागितल्याने कंगना रनौत पुन्हा वादात आली आहे. नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी खासदारकीच्या शपथेनंतर पहिल्याच दिवशी देखील वादाची परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. यंदा अनेक खासदार पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे त्यांच्या सरकारी निवासस्थानाची व्यवस्था होईपर्यंत दिल्लीत असलेल्या महाराष्ट्र सदनात तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, कंगना रनौत यांनी राहण्यासाठी महाराष्ट्र सदनाची पाहणी केली यावेळी खोल्या लहान असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची राखीव खोलीचा आग्रह धरला…. बघा नेमकं काय म्हणाल्या… आणि या मागणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया काय होती?