‘राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते, तेवढेच रस्त्यावर खड्डे’; दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं, काय लगावला टोला?

| Updated on: Aug 19, 2023 | 3:57 PM

VIDEO | अभिनेत्री दीपाली सय्यद यांची मनसेच्या खड्ड्यांच्या आंदोलनावर सडकून टीका, '...दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान कशाला करता? बाहेर स्टंटबाजी कशाला करता युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा..'

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | राज्यभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले दौरे सुरू केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभामधून मनसैनिकांना रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांबाबत आंदोलन करण्याचे आदेश दिलेत. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिक सक्रीय झाले आहेत. दरम्यान, अभिनेत्री आणि राजकारणात काहीशा मागे पडलेल्या दिपाली सय्यद यांनी मनसेला रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरून चांगलंच डिवचल्याचं समोर आले आहे. त्यांनी ट्वीट करत असं म्हटलं की, ‘मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते, तेवढे रस्त्यावर खड्डे…दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान कशाला करता? बाहेर स्टंटबाजी कशाला करता युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा..’, असे म्हणत दिपाली सय्यद यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.

Published on: Aug 19, 2023 03:45 PM
‘…टिमकी मिरवणाऱ्या मुख्यमंत्री’; बागलकोटमध्ये शिवरायांचा पुतळा हटवल्यावरून राऊत यांची शिंदे यांच्यावर बोचरी टीका
VIDEO | ‘शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जायची वेळ आलीय’; ठाकरे गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य; पवार यांच्यावर देखील जहरी टीका