WITT Global Summit : अभिनेत्री रवीना टंडन हिचा टीव्ही 9 नेटवर्क ‘नक्षत्र सन्मान’ पुरस्कारानं गौरव
देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा तीन दिवसीय व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रानंतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रवीना टंडन हिला नक्षत्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा तीन दिवसीय व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमात अनेक बड्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन हिनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रानंतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रवीना टंडन हिला नक्षत्र सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रवीना टंडनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी रवीना टंडन हिने पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच टीव्ही9 नेटवर्कचे आभारही मानले.यावेळी रवीना टंडन म्हणाली, मी बॉलिवूडमध्ये काम करत असताना माझ्या कामाचं जेव्हाही कौतुक व्हायचं तेव्हा चांगलं वाटायचं. डेब्यू पुरस्कार असो की हा पुरस्कार, मला नेहमीच आनंद वाटत आला आहे. एव्हर शायनिंग स्टारचा पुरस्कारही मला प्रचंड आवडला, असंही रवीना म्हणाली.