प्लीज मला मारू नका, रवीना टंडन करतेय गयावया, भर रस्त्यात कुणी घेरलं? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 02, 2024 | 4:10 PM

मुंबईतील रिझवी कॉलेजजवळ कारने तीन जणांना धडक दिल्याचे सांगितले जात असून तसा आरोपही केला जात आहे. यानंतर स्थानिकांनी रवीना टंडनला रस्त्यातच घेरलं असून तिच्यावर हात उचलल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बघा व्हिडीओ...

अभिनेत्री रवीना टंडनच्या चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील रिझवी कॉलेजजवळ कारने तीन जणांना धडक दिल्याचे सांगितले जात असून तसा आरोपही केला जात आहे. यानंतर स्थानिकांनी रवीना टंडनला रस्त्यातच घेरलं असून तिच्यावर हात उचलल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रवीना टंडन मला मारू नका, असं वारंवार ओरडत गयावया करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कार पार्किंग वरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर व्हायरल व्हिडीओमध्ये असेही दिसत आहे की, काही लोकं रवीना टंडनशी वाद घालत तिला धक्काबुक्की करत आहेत. तर रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रवीना मध्यस्थी करताना दिसत आहे.

Published on: Jun 02, 2024 04:10 PM
मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसात ठाकरे….राणांच्या दाव्यानं उडाली खळबळ
पुण्यात चाललंय काय? पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप, पोलिसांनी तरुणाकडून स्वत:चे पाय दाबून घेतले