Aditya-L1 Mission | चंद्रयान 3 नंतर भारताकडून आदित्य एल 1 यशस्वी लॉन्च, काय आहे नक्की मोहीम?
VIDEO | भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO कडून शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पहिलं सौर मिशन आदित्य एल 1 यशस्वी लॉन्च, जाणून घ्या नक्की काय आहे मोहीम? खगोल तज्ज्ञ सुरेश चोपणे नेमकं काय म्हणाले?
नागपूर, २ सप्टेंबर, २०२३ | ISRO ने शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आपलं पहिलं सौर मिशन आदित्य एल 1 लॉन्च केलं आणि ते यशस्वी लॉन्च झालं. या मिशनच्या माध्यमातून इस्रोच आदित्य एल 1 त्या पॉइंटपर्यंत पोहोचेल. या मिशनद्वारे L1 पॉइंट, सूर्याच तापमान, सौर वादळाची कारणं समजणार आहेत. चंद्रयान 3 नंतर भारत आता आदित्य एल 1 मोहीम लॉन्च करत असून ही मोहीम राबविणारा भारत हा तिसरा देश ठरणार आहे , ज्या प्रमाणे चांद्रयनचे फायदे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच प्रमाणे या मोहिमेचे सुद्धा फायदे पाहायला मिळणार आहे. याचा फायदा फक्त भारतालाच नाही तर जगातील इतर देशांना सुद्धा होणार आहे. यामुळे आतापर्यंत सूर्याच्या कक्षेतील अनेक बाबी पुढे आल्या नाही त्यासुद्धा यामुळे पुढे येणार आहे, असं खगोल तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी सांगितलं आहे.
Published on: Sep 02, 2023 04:08 PM