… म्हणून नारायण राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा काय?
थोड्याच दिवसांनी आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावं लागणार असून त्यांच्यासह संजय राऊतही असणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावर आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, नारायण राणे जेलमध्ये जात होते, म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई, २८ नोव्हेंबर, २०२३ : थोड्याच दिवसांनी आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावं लागणार असून त्यांच्यासह संजय राऊतही असणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावर आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, नारायण राणे जेलमध्ये जात होते, म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपली जेलवारी चुकवण्यासाठी नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे. तर याऊलट गेल्या तीन वर्षापासून केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे सांगताय, आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार असून ते जेलमध्ये जाणार आहेत, परंतु, सगळ्या यंत्रणा लावल्यानंतर आणि सीबीआयने वेगवेगळ्या प्रकरणात क्लिनचीट दिल्यानंतरही आदित्य ठाकरे कुठेही दोषी आढळले नाहीत, असेही वैभव नाईक यांनी सागंतिले आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.