तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
एकनाथ शिंदेंवरून आतापर्यंतचा मोठा गैप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. एकनाथ शिंदे यांचं पैशाचं गोडाऊन सापडलं होतं. आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर भाजपने सोबत येतो की जेलमध्ये टाकू असा इशारा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंसमोर शिंदे रडले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांचं पैशाचं गोडाऊन इनकम टॅक्सच्या हाती लागलं होतं. त्यामुळे अटकेच्या भितीने उद्धव ठाकरेंसमोर रडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याचा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदेंवरून आतापर्यंतचा मोठा गैप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. एकनाथ शिंदे यांचं पैशाचं गोडाऊन सापडलं होतं. आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर भाजपने सोबत येतो की जेलमध्ये टाकू असा इशारा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंसमोर शिंदे रडले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर बंड पुकारून सूरतला जात असताना वसईच्या चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मोठी ऑफर दिल्याचे सांगत आपण ती ऑफर नाकारला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरून मोठा धमाका केलाय. यामध्ये संजय राऊतांनीही उडी घेतली. शिंदेंना भाजप का अटक करणार होतं? असा सवाल करत शिंदेंसह फडणवीसांकडेही राऊतांनी मोर्चा वळवला, बघा काय केला हल्लाबोल?